Mumbai News : राज्य शिखर बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना दिलासा !

एमपीसी न्यूज : राज्य शिखर बँक कथित गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 69 जणांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात ईडीने केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरणाच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी आपल्या अहवालात केला होता. त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याचे मुंबई पोलिसांच्या अहवालात म्हटले होते. यामुळे उपमुख्यंत्री पवारांसह 69 जणांना दिलासा मिळाला आहे.

या अहवालास विरोध करणारा अर्ज ईडीने विशेष न्यायालयात केला होता. पण विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडीला आता या प्रकरणाचा तपास करता येणार नाही.

दरम्यान, पोलिसांचा अहवाल स्वीकारायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय मूळ तक्रारदाराचं संपूर्ण म्हणणं ऐकल्यावर देऊ, असं न्यायालयानं स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.