Mumbai : अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- खासदार संजय राऊत

एमपीसी न्यूज- अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा दिला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी असताना अजित पवार यांची जागा मुंबईच्या ऑर्थररोड जेलमध्ये असल्याचे वारंवार सांगितले जात होते. त्यासंदर्भात काही दबाव आणून आमदारांना आणि अजित पवार यांना फोडले आहे का ? की या पुढल्या कॅबिनेट बैठक ऑर्थररोड जेलमध्ये घेणार आहेत का ? असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होतो. राजभवनाच्या हा गैरवापर असून रात्रीच्या अंधारात असे खेळ चालतात” अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.