Pimpri news: महापालिका विषय समित्यांमध्ये ‘यांची’ वर्णी; महासभेत निवड

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समितीत नवीन सदस्यांची आज (बुधवारी) महासभेत निवड करण्यात आली. या पाचही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची प्रत्येक समितीत निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (बुधवारी) आयोजित केली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. या सभेत विषय समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. या समित्यांच्या पाक्षिक सभा होतात. त्यानुसार एका महिन्यात दोन सभा होतात. महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे या समित्यांच्या केवळ चार ते पाच पाक्षिक सभा होऊ शकतील.

विषय समिती आणि पक्षनिहाय निवड झालेले नगरसेवक!

विधी समिती: – संगीता भोंडवे, सुनीता तापकीर, स्वीनल म्हेत्रे, वसंत बोराटे, कोमल मेवानी(भाजप), संगीता ताम्हणे, गीता मंचरकर, विक्रांत लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस), अमित गावडे (शिवसेना)

महिला व बालकल्याण समिती:- सविता खुळे, उषा मुंढे, योगिता नागरगोजे, निर्मला गायकवाड, जयश्री गावडे (भाजप), स्वाती काटे, अनुराधा गोफणे, सुमन पवळे (राष्ट्रवादी काँग्रेस),रेखा दर्शले (शिवसेना)

शहर सुधारणा समिती:- आरती चोंधे, बाळासाहेब ओव्हाळ, सोनाली गव्हाणे, साधना मळेकर, अनुराधा गोरखे (भाजप), वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, समीर मासुळकर (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती:- नीता पाडाळे, शारदा सोनवणे, प्रा. उत्तम केंदळे, अश्विनी जाधव, शर्मिला बाबर (भाजप), अपर्णा डोके, डब्बू आसवानी, राजू मिसाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना)

शिक्षण समिती:- माधवी राजापुरे, मनीषा पवार, प्रियंका बारसे, सारिका सस्ते, शैलेश मोरे (भाजप), प्रज्ञा खानोलकर, भाऊसाहेब भोईर, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना)

सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समिती नियुक्त करण्यात येणा-या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर ढोरे यांनी सदस्यांची नावे वाचून समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.