Pimpri : महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेचा दीपस्तंभ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सतीश सोनी व महाराष्ट्र राज्य सहकरी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे विभागातून प्रथम क्रमांक म्हणून या पतसंस्थेची निवड झाली होती. त्यानिमित्त दीपस्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार पतसंस्थेच्या अध्यक्ष सीमा सुकाळे, सचिव मुकुंद वाखारे, खजिनदार महादेव बोत्रे व संचालिका चारुशिला जोशी यांनी स्वीकारला. संस्थेचे मागदर्शक व तज्ज्ञ संचालक बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती पतसंस्थेच्या वतीने देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.