Pimpri News: महापालिका निवडणूक! इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्याने आणि प्रभागनिहाय मतदार यादी विभाजनाचे काम सुरु झाल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू करून कामाला लागले आहेत. तिकिटासाठी काही जणांनी आतापासूनच सेटिंग लावायला सुरुवात केली आहे.

 

महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रभागात कुठल्या भागाचा समावेश झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रभागात आपल्याबरोबरचा उमेदवार कोण असेल, याचाही अंदाज बांधला जात होता. इच्छुकांकडून पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. निवडणुकीच्या कामाला लागत असल्याचे सांगताना यावेळी तिकिटाचे तेवढे बघाच, अशी आर्जवही नेत्यांना केली जात आहे. काही विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्ती आणि त्यांचे काम पाहूनच मतदान होते. मात्र, तीन सदस्य प्रभाग झाला असून, प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 40 हजार अशी आहे. त्यामुळे ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित होण्याऐवजी पक्षाच्या चिन्हावर होणार आहे. परिणामी, बरीचशी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.