India Corona Update : एक महिन्यानंतर एक लाखांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद, 895 मृत्यू 

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात एक ते दोन लाखांच्या दरम्यान नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ नोंदवली जात होती. एक महिन्यानंतर संसर्गाचा वेग मंदावला असून गेल्या 24 तासांत एक लाखांहून कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत देशभरात 83,876 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 22 लाख 72 हजार 014 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 06 लाख 60 हजार 202 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत 1 लाख 99 हजार 054 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 96.19 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 11 लाख 08 हजार 938 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. आजवर देशात 5 लाख 02 हजार 874 कोरोना रूग्ण दगावले आहेत. देशाचा मृत्यूदर 2.90 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 74 कोटी 15 लाख 61 हजार 587 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 11.56 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 169 कोटी 63 लाख 80 हजार 755 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.