Pune News : पुण्यात निर्घृण खून ! शीर, हात, पाय छाटलेला मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत निर्घृण खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील भीमा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि शीर कापलेला मृतदेह सापडला आहे. या संपूर्ण प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मासेमारीचा व्यवसाय करणारे संतोष हे मंगळवारी भवरपूर येथून बहिणीला भेटण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला.

मागील अनेक वर्षापासून संतोष हे भीमा व मुळा मुठा नदीवर मासेमारीचा व्यवसाय करत होते. दरम्यान अशाप्रकारे निर्घृण खून करण्यात आल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अद्यापही संपूर्ण मृतदेह सापडला नाही. मृतदेहाचे दोन्ही पाय आणि एक हात गायब असल्याने पोलीसही चांगलेच चक्रावले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.