Pimpri News : फुले विदेशात निर्यात करण्याकडे शेतकऱ्यांचा कल; पुणे, पिंपरीत फुलांची आवक कमी

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या  साथीमुळे  फूल उत्पादक  शेतकऱ्यांना बसलेल्या  आर्थिक  नुकसानीमुळे  उत्पादकांची संख्या  30 ते 35 टक्के कमी झाली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनही घटले. फुलांच्या वाढीवरही  परिणाम झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत मागणी व रास्त भाव मिळत असला. तरी, विदेशी व संभाव्य ग्राहक  टिकून  ठेवण्यासाठी फुलांची  निर्यात करावी असा शेतकर्‍यांचा कल  आहे.

देश, विदेशात सततची वाढती  मागणी  असल्याने पिंपरी व पुणे  फुल बाजारात अत्यंत कमी आवक होत असल्याचे चिंचवड स्टेशन येथील फुल विक्रेते पंढरीनाथ म्हस्के यांनी सांगितले. म्हस्के 1993 पासुन पुष्प व पुष्पगुच्छ  विक्रीचा व्यवसाय करत आहेत.

 

साधारणतः 100 ते 150 रुपयांना मिळणारा लाल गुलाबाची 20 फुलांची गड्डी 300 ते 330 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर रंगीत म्हणजे गुलाबी पिवळा व पांढरा गुलाब 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
ही भाववाढ विक्रमी आहे. पण,  उत्पादन कमी  राहिल्याने  शेतकर्‍यांचा  फायदा होणार नसल्याची हळहळ मावळातील गुलाब उत्पादक सोमनाथ  ठाकर व्यक्त केली.

प्रचंड भाववाढ असल्याने  फुलांच्या विक्रीत अडचण येत असल्याचे फुलांचे घाऊक पुरवठा करणारे ज्ञानेश्वर केमसे यांनी सांगितले. दुकानातील नेहमीचे  ग्राहक विशेषता तरुण ग्राहक टिकवण्यासाठी  थोडी तरी खरेदी करून आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे ओम  फ्लेवर्सचे केशव त्रिभुवन यांनी सांगितले.

त्याच बरोबर ग्रीन म्हणजे बुके बनवण्यासाठी लागणारे  sprengery 10 ते 15 रूपांवरुण 40 ते 50 रुपये, कामिनी 8 ते 10 रुपयांवरुण 30 ते 35 रुपये अशी  वाढ झाल्याने  सर्वच  किरकोळ  फुलांचा व्यवसाय करणारे चिंतेत आहेत. भाववाढीची  ही ट्रेंड अशीच राहिल्यास  नाईलाजास्तव  ऑनलाईन  विक्रीत अग्रेसर असणारे आशुतोष दिघे म्हणतात artificial फुलांची विक्रीचा कल वाढू शकतो. पर्यायाने आधीच विविध कारणांनी नडलेला  फुलांची शेती करणारा शेतकरी संकटात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.