Pune : हिंदू व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी हिंदू मुस्लिम तरुणांचा पुढाकार, पुण्याजवळील केसनंद मध्ये माणुसकीचे दर्शन

Muslim men cremate Hindu man in Kesnand near Pune.

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद मध्ये हिंदू समाजातील व्यक्तीचं शनिवारी (दि.23) निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे जवळ आप्तस्वकीय कोणी नव्हते. मुस्लिम तरुणांनी  हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले.

लाॕकडाउनच्या परिस्थिती मध्ये जर कोणी मृत पावलं तर त्यांच्याकडे कोणाला  सुद्धा जाता येत नसल्याचे चित्र आहे. अशीच एक घटना पुण्याजवळील  केसनंद मध्ये घडली घडली. एका हिंदू समाजातील व्यक्तीचं काल निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे वेळेवर,पोहोचू शकले नव्हते .

मात्र याचवेळी सामाजिक सौहार्दाचं उदाहरण देत हिंदू मुस्लिम बांधवांनी त्या हिंदू व्यक्तीचे हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले केसनंद येथील राम शेकू क्षीरसागर यांचे काल निधन झाले.

अशा परिस्थितीत त्याच्या जवळ कोणीही नसल्याने  त्यांचा अंत्यविधी कसा करणार हा प्रश्न उभा राहिला. अशावेळी परिसरातील  राहणारे मुस्लिम हिंदू बांधव पुढे आले.

सामाजिक एकोपा जपत  हिंदू मुस्लिम बांधवांनी  राम शेकू क्षीरसागर यांना आपल्या खांद्यावर घेऊन हिंदू स्मशान भूमीमध्ये ‘राम नाम सत्य है’ चा जप करत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

यावेळी जानमहमद पठाण, आप्पा शेख,रहिमभाई शेख,आसीफ शेख,शद्दाम शेख,अलताप शेख,साहेबराव जगताप,बच्चन आंळदे गावचे पोलिस पाटिल पंडित हरगुडे  यांनी पुढाकार घेत  हा शेजार धर्म आणि माणुसकीचा धर्म आहे जो आम्ही पार पाडला आणि अशाच माणुसकीची गरज सध्या या परिस्थितीमध्ये आहे, असं सांगितलं. कोरोनाच्या या महामारीत अशा सामाजिक एकोप्याच्या घटना माणुसकीचे नवे आयाम दाखवत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.