Tuljapur News : पुजारी बांधवांना भक्तांसोबत देवीच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश; लवकरच निर्णय होणार – नगरध्यक्ष सचिन रोचकरी

एमपीसी न्यूज – श्री तुळजाभवानी मातेच्या सर्व पुजारी बांधवांना दि. 16 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची चर्चा बैठक उपविभागीय अधिकारी तथा तुळजाभवानी मंदीर विश्वस्त खरमाटे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठक दि. 21 नोव्हेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान ठरल्याप्रमाणे पुजारी बांधवांना भक्तांसोबत गाभार्‍यामध्ये प्रवेश देणे, भाविकांची संख्या वाढवणे तसेच पेड दर्शनाचे मुल्य 300 रु. हे जास्त होत आहे ते कमी करणे आदी विषयावर चर्चा झाली होती. त्या अनुशंगाने दि. 16 डिसेंबर रोजी पुन्हा बैठक आयोजीत केली होती.

या बैठकीत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी वरिल विचार करून त्वरीत निर्णय व्हावा, अशी आग्रही भुमिका घेतली त्यावरती उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वाशन दिले, या बैठकीस पाळीकर, भोपे, उपाध्ये मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.