Nashik News : राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारीला होणार साजरा

एमपीसी न्यूज : यंदाचा राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, हा ११ वा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. या दिवसासाठी विषय “आपल्या मतदारांना सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक बनवूया” “Making our Voters Empowered, vigilant, safe and informed” हा आहे.

कार्यक्रमावेळी e-EPIC प्रणालीचे प्रक्षेपण करून आगामी निवडणुकांसाठी e-EPIC प्रणाली बाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच पुनरीक्षण कार्यक्रम २०२१ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानपत्रे देण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.