NCP : …तर गोपीचंद पडळकर यांच्या तोंडाला काळे फासू; नाना काटे यांचा इशारा

एमपीसी न्यूज –  आमचे दैवत उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP) यांच्यावर टीका करणारे गोपीचंद पडळकर यांनी स्वतःचे तोंड आरशात पाहून टीका करावी. पडळकर यांनी स्वतःच्या समाजासाठी काय केले, स्वतःच्या पक्षासाठी तरी काय केले. केवळ पावसाळी बेडकाप्रमाणे डराव डराव करू नये, पडळकर यांनी अजितदादा वरती टीका करताना शंभर वेळा विचार करावा. अन्यथा तोंडाला काळे फासू असा इशारा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी  दिला आहे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पण, अजित पवारांना पत्र लिहिलं नाही. याबद्दल प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक झाले असून (NCP) गोपीचंद पडळकर यांना भाजपने समज द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते गोपीचंद पडळकर यांची नाकेबंदी करतील असा इशारा आहे देण्यात आला आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त ज्ञानेश्वरीतील गणेशाच्या ओवी पठणाचा नवा उपक्रम

राज्यातील महायुती सरकार मध्ये उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार सहभागी झाल्यानंतर भाजपमधील अनेक वाचाळवीरांना काय करावे सुचत नाही. त्यातीलच एक मंगळसूत्र चोर असणारा पडळकर यांना अजित पवार यांच्या सारख्या मोठ्या नेत्यावर चिखलफेक केली की भरपूर प्रसिद्धी मिळते.

मग लोकांना आपोआप पडळकर नावाचा कोणी तरी नेता आहे हे कळू लागतं. मोठ्या लोकांवर टीका करून आपलं अस्तित्व प्रस्थापित करायचं.  राजकीय भवितव्य टिकवून ठेवण्यासाठीच केविलवाणी धडपड केली आहे असे  काटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.