Pimpri News : ‘गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है’, ‘चोरांचा पक्ष बीजेपी पक्ष’, ‘धरा दाम पण करा काम’

राष्ट्रवादीचा महापालिकेवर मोर्चा, जोरदार घोषणाबाजी

एमपीसी न्यूज –  ”गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है”, ”चोर है, चोर है भाजपवाले चौर है”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”आमच्या नळाला पाणी नाही”, ”आमच्या परिसरातील संडास सफा सफाई होत नाही, पैसे घ्या पण धुऊन द्या”, ”भगाओ, भगाओ चोर भगाव”, ”पकडला पकडला चोर पकडला”, ”जेलात होता चोर होता है”,  ” भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो”, ”चोरांचा पक्ष बीजेपी पक्ष’, ”नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी”, ”बीजेपी हमे डरती है पोलीस को आगे करती है”, अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेवर मोर्चा काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. हातगाड्यावर टोपली ठेवली होती. त्यात नकली पैसे ठेवले होते. त्यावर खाऊ गल्ली असा उल्लेख होता.  ‘धरा दाम पण करा काम’ करा अशा घोषणा दिल्या जात होत्या.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे,  विक्रांत लांडे, समीर मासूळकर, राजू बनसोडे, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, निकिता कदम, संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, अतुल शितोळे, काळूराम पवार, जगन्नाथ साबळे, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित लांडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.