Talegaon News : एक किलो चांदी आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक किलो चांदी आणि सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

शेखर शंकर गोडखिंडी (वय 67, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर 22 ऑगस्ट सकाळी साडेदहा ते 31 ऑगस्ट सकाळी आठ वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील सात ग्रॅम सोने व एक किलो चांदीच्या वस्तू असा एकूण 48 हजार रुपयांचा माल चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.