New Delhi : मोठी बातमी! सोमवारपासून देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू होणार

एमपीसी न्यूज – केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी ट्वीटरवरुन 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

अलीकडेच सरकारने रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांनतर आता 25 मेपासून म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत उखाणे देखील सुरू होणार आहेत.

याबाबत हरदीप पुरी म्हणाले, सोमवार 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरू होतील. याबाबत सर्व विमानतळांना सूचना दिल्या जातील. प्रवाशांसाठी ‘SOP’ देखील जारी करण्यात येत आहे. 25 मेपासून टप्प्याटप्प्याने या विमानसेवा सुरू केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वरूपाची उड्डाणे सुरू करण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट केले होते. देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केवळ नागरी विमान उड्डाण मंत्रालय, भारत सरकार किंवा केंद्रच घेऊ शकत नाही.

तर सहकारी संघवादाच्या भावनेने राज्य सरकार देखील परवानगी देण्यास तयार असावी जेथून विमाने टेक ऑफ आणि लँड करतील.

दरम्यान, २२ मार्चपासून देशातील लॉकडाउन जारी झाल्यापासून घरगुती उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपेल. रेल्वेने मंगळवारी 200 नॉन-एसी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वेळापत्रकानुसार या गाड्या 1 जून पासून दररोज धावतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.