New Delhi: भारतात एका दिवसात 525 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा!

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 525 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडल्याने भारतीयांच्या चिंतेत भर पडली आहे. ही संख्या आता 3 हजार 72 झाली आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने संध्याकाळी कोरोनाबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर केली.  त्यानुसार कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,072 असून त्यापैकी 2,784 सक्रिय केसेस आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या, घरी सोडलेल्या अथवा स्थलांतरीत झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 213 आहे तर आतापर्यंत 75 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

‘कोविड 19 इंडिया डॉट ऑर्ग’ या वेबसाईटवरील माहितीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 3,495 असून त्यापैकी 3,141 केसेस सक्रिय आहेत. आतापर्यंत 262 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर मृतांचा आकडा 91 वर पोहचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.