Pune : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे भक्तीभावपूर्ण वातावरणात विसर्जन

​एमपीसी न्यूज – पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे मुठा नदीच्या नटेश्वर घाटावर कृत्रिमरित्या बांधलेल्या हौदात विसर्जन करण्यात आले. 

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण निरोप देत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कसबा गणपतीची टिळक पुतळा येथून सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मिरवणूक घाटावर पोहोचली. त्यानंतर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.