Hinjawadi : दरवाजा उघडा ठेवून गप्पा मारणं पडलं महागात

 चोरट्यांकडून सोनसाखळी लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजा उघडा ठेवून बेडरूममध्ये मोलकरणीशी गप्पा मारणे एका महिलेला महागात पडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील 40 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना हिंजवडी येथे घडली.

श्रद्धा सुभाष मेनगर (वय 28, रा. विवा आयकॉन हाऊसिंग सोसायटी, हिंजवडी) यांनी शनिवारी (दि. 31) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वादोन वाजताच्या दरम्यान श्रद्धा यांनी आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून त्या बेडरूममध्ये मोलकरणीशी गप्पा मारत होत्या. त्यावेळी चोरट्याने घरात प्रवेश करीत आतील 40 हजार रुपयांची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.