Pune : जमिनीवर डोके आपटून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज – कौटुंबिक वादातून चिडून पतीने डोके आपटून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-मुंबई बेंगलोर महामार्गालगत वारजे ब्रिजजवळ घडली.

याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी पती बाबू शेख (वय 34, गावठाण, पुणे), याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबू यांच्या पत्नीला टीबीचा आजार होता. यावरून त्यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री कौटुंबिक वाद झाले. यामुळे चिडून बाबू याने पत्नीला मारहाण करीत गळा दाबला. नंतर तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.