मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Beed news : न्यू आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन तर  न्यू आष्टी – अहमदनगर डेमू सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

एमपीसी न्यूज : न्यू आष्टी – अहमदनगर डेमू सेवेच्या उद्घाटन सेवेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीश्री देवेंद्र फडणवीस; श्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी पार पडले.(Beed news) न्यू आष्टी रेल्वे स्थानकावरून  हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ केला. तत्पूर्वी, नवीन आष्टी- अहमदनगर या नवीन रेल्वे मार्गिकेच्या (66 किमी) फलकाचे अनावरणासह उद्घाटन यावेळी करण्यात आले.

श्री राधाकृष्ण विखे पाटील, माननीय महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री, महाराष्ट्र सरकार, श्रीमती पंकजा मुंडे, महाराष्ट्राच्या माजी मंत्री, माननीय खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे पाटील, विधान परिषदेतील माननीय आमदार श्री सुरेश धस, श्री राम शिंदे, विधान सभेतील माननीय आमदार श्री बाळासाहेब आजबे, श्री लक्ष्मण पवार, माजी आमदार श्री शिवाजी कर्डिले आणि श्रीमती  पल्लवी धोंडे, नगराध्यक्षा यावेळी  उपस्थित होते.

श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि नवीन डेमू (DEMU) ट्रेन सेवांची माहिती दिली. (Beed news)  श्री मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण); श्री मुकुल जैन, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, श्री अजोय सदनी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, श्री शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर विभाग, मध्य रेल्वे आणि इतर अधिकारी आणि जनता मोठ्या संख्येने  यावेळी उपस्थित होते.

CM Eknath Shinde : ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 पार्श्वभूमी आणि फायदे:

• 66 किमी न्यू आष्टी- अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे जो भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाच्या वाटणीत आहे.
• डेमू (DEMU) सेवा न्यू आष्टी- अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
• डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टी येथे सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल.  ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.
• ही डेमू ट्रेन कडा, न्यू धानोरा, सोलापूरवाडी, न्यू लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

Latest news
Related news