गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Central Railways : मध्ये रेल्वेचा तिकीट तपासणी महसूल 150 कोटी पार

गेल्या वर्षीच्या तुलनेत 136% वाढ

एमपीसी न्यूज : 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत मध्य रेल्वेने 154.57 कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला.(Central Railways) विनातिकीट/अनियमित प्रवासातून मिळालेल्या महसुलापेक्षा गेल्या वर्षीच्या याच कालावधीत झालेल्या 65.58 कोटींपेक्षा यंदा 135.70% वाढ झाली आहे.

विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण 23.20 लाख प्रकरणे आढळून आली, मागील वर्षी याच कालावधीत 11.44 लाख प्रकरणे आढळली होती, त्यात 102.69% वाढ झाली आहे.

1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत, केवळ तिकीट नसलेल्या प्रवाशांची एकूण 20.97 लाख प्रकरणे आढळून आली, मागील वर्षी याच कालावधीत 10.65 लाख प्रकरणे होती,( Central Railway) त्यात 96.90% वाढ झाली आहे. अशा विनातिकीट प्रवाशांकडून 130.43% ची वाढ दर्शवून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (20.9.2022 पर्यंत) ₹144.50 कोटी महसूल प्राप्त झाला, तर 2021-22 मध्ये (२०.९.२०२१ पर्यंत) ₹62.71 कोटी महसूल प्राप्त झाले होते.

Beed news : न्यू आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन तर  न्यू आष्टी – अहमदनगर डेमू सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

विभागनिहाय प्रकरणे आणि महसूल खालीलप्रमाणे आहेतः

मुंबई – 9.01 लाख प्रकरणे आणि ₹51.13 कोटी

भुसावळ – 4.89 लाख प्रकरणे आणि ₹38.58 कोटी

नागपूर – 3.34 लाख प्रकरणे आणि 22.36 कोटी

सोलापूर – 2.72 लाख प्रकरणे आणि ₹17.59 कोटी

पुणे – 1.62 लाख प्रकरणे आणि 11.27 कोटी

मुख्यालय – 1.61 लाख प्रकरणे आणि 13.64 कोटी

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

 

 

 

spot_img
Latest news
Related news