Pimpri :  शहरात पावसाची दमदार हजेरी 

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल गुरुवार (दि. 27) पासून पिंपरी-चिंचवडमध्ये हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळपासून झालेली रिपरिप आज दिवसभर सुरु होती. गेल्या काही दिवसापासून पाऊस लांबणीवर होता. पावसाने कालपासून शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. शहर व उपनगरांतही पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (दि. 29 जून ) ही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी रात्रीपासून सुरु असणा-या पावसामुळे आज ही दिवसभर पाऊसाची रिपरिप सुरु होती. पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे गेल्या आठवड्यापासून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. कालपासून शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. ब-याच प्रतीक्षेत असलेल्या पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले. जून संपत आल्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1