New Thergaon Hospital: प्रसूतीकक्ष, प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला लक्ष्य प्रमाणपत्र

एमपीसी न्यूज – मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी प्रसूतीकक्ष (New Thergaon Hospital)व शस्त्रक्रिया विभागामधील गुणवत्ता वाढ तसेच मातांना सुरक्षित प्रसुती आणि मातृत्वाचा आनंद घेता यावा यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेसाठी केंद्र शासनाच्या  ‘लक्ष्य’ (LaQshya) या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातील प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (NQAS) गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

प्रसूतीचा सुरक्षित आणि आनंददायी अनुभव प्रत्येक गर्भवती महिलेला(New Thergaon Hospital) मिळावा अशी तिची आणि  तिच्या कुटुंबाची  इच्छा असते.  यासाठी देशातील मातामृत्यु आणि बालमृत्यु दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य आणि व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘लक्ष्य’ (Labour Room Quality Improvement Initiative) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.

 

Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालयाच्या नूतन वास्तुचे बुधवारी भूमिपूजन

 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा, महापालिका रुग्णालयांतील प्रसुतीकक्ष आणि प्रसूती शस्रक्रिया विभागामधील देण्यात येणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारावी तसेच प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर प्रत्येक स्त्रीला सन्मानपूर्वक आणि उच्च दर्जाची मातृत्व काळजी प्रदान केली जावी, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयातील प्रसुतीकक्ष व प्रसूती शस्त्रक्रिया विभागाने लक्ष्य उपक्रमांतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि एसओपी (मानक ऑपरेटिंग प्रक्रिया) नुसार राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक (एनएक्यूएएस) प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. सुविधांच्या गुणवत्तेसाठी केंद्र शासनाच्या ‘लक्ष्य’ (LaQshya) या  उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयातील प्रसूतीकक्ष आणि प्रसूती शस्त्रक्रिया विभागाला केंद्रस्तरीय पथकाने नोव्हेंबर 2023 मध्ये भेट देऊन परीक्षण केले होते.

त्याअनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन थेरगाव रुग्णालय येथील प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाकरिता केंद्र शासनाच्या ‘लक्ष्य’ (LaQshya) या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाकडील लक्ष्य (LaQshya) राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार,  थेरगाव स्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

यापूर्वी महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयास (प्रसूतीकक्ष व शस्त्रक्रिया विभागाकरिता) 17 ऑक्टोबर 2022 रोजी आणि ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे, आकुर्डी रुग्णालयातील प्रसूती कक्षाकरिता 16 मे 2023 रोजी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुणालयातील शस्त्रक्रिया विभागाकरिता राज्यस्तरीय परीक्षण 20 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झालेले असून राष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीची कार्यवाही चालू आहे.

https://www.youtube.com/watch?v=p2J4S5CBwko&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.