Nigdi : दृष्टिहीनांच्या संवेदना सर्वसामान्यांहून सजग – स्मिता जाधव

एमपीसी न्यूज- दृष्टिहीनांना नोकरी मिळवणे तसे कठीणच असते. त्यामुळेच मिळेल ते काम करणे हेच बहुतांश अंधांच्या नशिबी येते. पण निसर्ग अन्याय करीत नाही. एक बाजू दुबळी असेल तर दुसऱ्या एखाद्या बाजूला अधिक शक्ती देऊन निसर्ग या दुबळेपणाची भरपाईही करतो. म्हणूनच, दृष्टिहीनांच्या संवेदना सामान्यांहून सजग असतात. त्यांच्या कौशल्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला तर त्यांच्या अंधारमय आयुष्यात सुगंध पसरेल असे मत सामाजिक कार्यकर्त्या स्मिता जाधव यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या वतीने सावरकर भवन येथे ‘अंधांसाठी मनाची सकारात्मक शक्ती’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, जितेंद्र शर्मा, रो. सतीश आचार्य, विलास गावडे, बलवीर चावला, बहार शहा, रो. गावििन, रो. मेबेल, रो. कुलदीप आणि मेघना, रो. पूनम पवार, रो. शितोळे, रो. आदिती जोशी, दीपा जावडेकर, कार्लियन, बिया आणि पेड्रो आदी 60 अंध विद्यार्थी उपस्थित होते.

स्मिता जाधव पुढे म्हणाल्या, ” विकलांग व्यक्तिच्या शारीरिक कमतरतेची भरपाई मात्र देवाने मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ माणसाच्या बरोबरीचे आयुष्य जगू शकतात. गरज असते ती आपण त्यांच्यावर विश्वास दाखविण्याची, त्यांना प्रोत्साहन देण्याची”

शारीरिक व्यंगे असलेल्या व्यक्तींमधील सुप्त कौशल्ये शोधून ती विकसित करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.