Rotary Club : रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी संजय प्रधान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या (Rotary Club) अध्यक्षपदी रो. संजय प्रधान व रो. संतोष गिरंजे यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या थरमॅक्स चौक येथे असलेल्या कम्युनिटी सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी प्रांतपाल डॉ. अनिल परमार व त्यांच्या पत्नी डॉ. हेमा परमार, मधुरा प्रधान, संजय प्रधान यांचे वडील  दत्तात्रय प्रधान, त्यांच्या मातोश्री नीलिमा प्रधान, ज्येष्ठ बंधू अनिरुद्ध प्रधान बहिण डॉ. शर्मिला प्रधान तुबे भाजपच्या आमदार उमा खापरे व पिंपरी चिंचवड शहरातील दीडशेहून अधिक प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Pimpri News: नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

अध्यक्ष रो. संजय प्रधान व सचिव रो. संतोष गिरंजे रोटरी पिंपरी यांच्याबरोबरच समितीत रो. आनंद संपत खजिनदार, रो. अभिजीत शिंदे पूर्व अध्यक्ष, रो. नितीन ढमाले जिल्हा फाउंडेशनचे डायरेक्टर, रो. सदानंद नायक क्लब फाऊंडेशन डायरेक्टर, रो. डॉक्टर मनीष फरांदे  नामांकित अध्यक्ष , रो. प्रकाश जेठवा मॅनेजिंग ट्रस्ट, रो. बाबा भापकर सहसचिव, रो. विमल रावत ट्रेनर, रो. श्वेता रावत डायरेक्टर न्यू जनरेशन, रो. मेहुल परमार सभासद डायरेक्टर, रो. सूर्यकांत जाधव सर्विस डायरेक्टर, रो. अतुल दयामा सर्विस डायरेक्ट वैद्यकीय, रो. पवन गुप्ता वोकेशनाल डायरेक्टर, रो. सनी सोळंकी पर्यावरण डायरेक्टर, रो. गिरीश फिरगणे पब्लिक इमेज डायरेक्टर, रो. शांतीलाल खिवंसरा डायरेक्टर बाय लॉज यांचा (Rotary Club) समावेश असणार आहे.

 

अध्यक्ष संजय प्रधान यांनी ऑगस्ट गॅदरिंग निमित्ताने केलेल्या त्यांच्या भाषणात एपीएफ फाउंडेशन निधी पोटी पन्नास हजार डॉलर, 40 हजार डॉलर सीएसआर फंड दहा हजार पोलिओ फंडासाठी, तर 25 हजाराहून अधिक डॉलर इंडोनमेंट फंड रोटरी जिल्ह्यासाठी देण्याची घोषणा केली. त्यामधील पन्नास हजार डॉलरचा चेक प्रांतपाल डॉक्टर अनिल परमार यांना सुपूर्द करण्यात आला.

अध्यक्ष संजय प्रधान पुढे बोलताना म्हणाले, अनेक समाज उपयोगी योजना यावर्षी राबवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामध्ये हायड्रोपोनिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करून खेडेगावातील शेतकऱ्यांना चारा बनवण्यासाठी शिक्षण देणार असल्याचे सांगितले. महिला सक्षमीकरण, सर्वांसाठी साक्षरता व  स्वच्छता अभियान राबवणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन ग्लोबल ग्रांट तर खोपेवाडी व खरपूड (जिल्हा खेड) गावांमध्ये रोटरी पिंपरीद्वारे चालू असलेल्या आधीच्या हॅप्पी व्हिलेजचा प्रोजेक्ट प्राथमिक अवस्थेतून आधुनिक अवस्थेमध्ये म्हणजे आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना तयार (Rotary Club) असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.