Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे लॅचलॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून 3 लाख 25 हजार रुपये किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.