Nigdi :  भुयारी मार्गास ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्याची मागणी 

माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी गावठाण ते निगडी एसबीआय बँक या ठिकाणी (Nigdi)  भुयारी मार्गाचे काम सुरू असून हे काम हे पुर्णत्वास आले आहे. या भुयारी मार्गास ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भुयारी मार्ग’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत  खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम करण्यात आले.

या उड्डाणपुलास “जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती)” उड्डाणपुल ‘ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आम्ही 25 मे 2018 रोजी महापालिका आयुक्तांना (Nigdi)  निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा विचार करून ‘फ’ प्रभाग समिती व  महासभेकडून अखेर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता.

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरण्याची तारीख जाहीर

पुणे जिल्हा हा राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगत आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून निगडी येथील भुयारी मार्गास ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ भुयारी मार्ग’ असे नाव देण्यात यावे, तसेच या भुयारी मार्गाच्या आतील बाजूस राजमाता जिजाऊ साहेबांच्या जिवनकार्यातील महत्वपूर्ण घडामाेडींचे चित्र रेखाटण्यात यावे, हिच खरी राजमाता जिजाऊंना मानवंदना (Nigdi)  ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.