Nigdi : आकुर्डी येथील स्थानक भवनात धार्मिक वातावरणात पर्युषण पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज – निगडी-प्राधिकरणच्या आकुर्डी येथील स्थानक भवनात चातुर्मास आणि पर्युषण पर्व आनंद श्रमणी रत्ना उपप्रवर्तिनी कंचनकंवरजी आदी ठाणा 7 च्या सानिध्यात मोठ्या उत्सवात साजरा होत आहे.

संवत्सरी पर्व शुद्ध रूपाने अष्टदिवसीय आध्यात्मिक पर्व आहे. जैन धर्मामध्ये हे आत्म-चिंतन, आत्म-निरीक्षण, आत्म-मंथन,आत्म शोधनाचे पर्व आहे. याच काळात श्री. वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी-निगडी-प्राधिकरणच्या आकुर्डी जैन स्थानकात ललीता जितेंद्र फिरोदीया या दिघी येथील 41 वर्षीय जैन भगिनीने 31 दिवसाचे निरंकार उपवासाचे (मासखमण) प्रत्याख्यान घेतले.

तसेच 31 श्रावक-श्राविकानी आठ दिवसाचे उपवास केले. तर २७ जणांनी ३ दिवसीय उपवासाची तर अनेक धर्मप्रेमी भक्तांनी आयंबील व एकासन तपाची आराधना करत आणि त्याग तपस्या, ध्यान, मौन, जप, स्वाध्याय आदी अनेक प्रकारच्या अनुष्ठानद्वारा हा अनोखा सण साजरा करीत आहेत. तसेच पर्युषण पर्वामध्ये अष्ट दिवसीय २४ तासांचा अखंड नवकार महामंत्राचा जाप सप्ताह सुद्धा निरंतर सुरू आहे.

महासतीवृंदांच्या कडून अंतगडसुत्र, प्रवचन आदिच्या माध्यमाने धर्म प्रबोधनाचे कार्य निरंतर चालू आहे, अतिशय धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात चातुर्मास सुरु आहे. आज तागायत देशभरातून बेंगलोर, औरंगाबाद, चेन्नई, नेवासा, अहमदनगर आदी ठिकाणाहून असंख्य श्रावकांनी साध्वींच्या दर्शनासाठी संघाला भेटी दिल्या आहेत.

याच कालावधीत आनंद श्रमणीरत्ना उपप्रवर्तिनी कंचनकवरजी यांच्या प्रेरणेतून आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाने पूरग्रस्त सांगली जिल्हयातील शिरटे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४२७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेषाच्या माध्यमाने भरीव मदत केली .

तसेच श्री संघासाठी विशेष गौरवास्पद गोष्ट आहे. या श्रमण संघातून ९ श्राविका याच काळात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी साधु संत चातुर्मासा साठी पोहचू शकले नाहीत, तेथे स्वाध्यायी म्हणून जाऊन दरवर्षी अष्टदिवसीय पर्युषण पर्वात शास्त्रवाचन व आध्यत्मिक सेवा देतात.

चातुर्मास व पर्युषण पर्व यशस्वीरित्या संपन्न व्हावा म्हणून अध्यक्ष संतोष कर्नावट, उपाध्यक्ष सुभाष ललवाणी, राजेंद्र खिवंसरा, धनराज छाजेड, सचिव प्रकाश मुनोत, शाम बोरा, मदन कांकरिया, राजेंद्र रातडिया, राजेंद्र छाजेड, जवाहर मुथा, रमण बाफणा, विजय ओस्तवाल, पोपटलाल कर्नावट, सूर्यकांत मुथीयान, मोतीलाल चोरडीया, नेनेसुख मांडोत, राहुल पारख, सचिन गांधी, अशोक नहार आदी विश्वस्तांनी चंदनबाला महिला मंडळ, सुशिल बहुमंडळ, ब्राम्ही मंडळ, गुरुआनंद प्रार्थना मंडळ यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.