Nigdi: जग्‌तगुरू संत तुकाराम महाराज स्वागत पालखी सोहळा ट्रस्टतर्फे वारक-यांना टाळ, महाप्रसादाचे वाटप

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारक-यांना जग्‌तगुरू संत तुकाराम महाराज स्वागत पालखी सोहळा ट्रस्टतर्फे टाळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते 450 वारक-यांना टाळ वाटण्यात आले. तसेच 12 टन बुंदी प्रसादाचे वाटप केले.

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आज उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला. पालखी रथाचे कामगार नेते इरफान सय्यद यांनी सारथ्य केले.

भक्ती-शक्ती चौक येथे जग्‌तगुरू संत तुकाराम महाराज स्वागत पालखी सोहळा ट्रस्टतर्फे वारक-यांना टाळ वाटण्यात आले. सकाळपासून वारक-यांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • याप्रसंगी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिरुर लोकसभा महिला संघटिका सुलभा उबाळे, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, सुजाता पालांडे, नगरसेवक सचिन चिखले, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित धुमाळ, सचिव प्रमोद भावसार, कार्याध्यक्ष अशोक काळे, दलवीर सिंघ, रोहतास चौधरी, महेंद्र गर्ग, तायल साहेब, राजेन्द्र मालू, संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, युवा नेते किसन बावकर,

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा स्वागत समिती ट्रस्टचे कार्याध्यक्ष भिवाजी वाटेकर, उपाध्यक्ष पांडुरंग कदम, खंडू गवळी, ज्ञानोबा मुजुमले, सचिव सर्जेराव कचरे, खजिनदार गोरक्षनाथ बांगर, सतीश कंठाले, सुनील सावले, बबन काळे, ज्ञानेश्वर पाचपुते, गुलाब शिंदे, शंकर मदने, गोरक्ष दुबाले, अशोक साळुंके, आबा मांढरे, समीर गुजर, राजू तापकिर, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, आशा भालेकर, स्मिता जगदाळे, पंचायत समिती सदस्या ज्योती आरगडे, सुखदेव नरळे, सचिन सानप,अमित शिंदे, दिलीप सावंत, कैलास नेवास्कर, शरद हुले, भाऊ काटे, दिलीप दंडवते, रुपाली आल्हाट, रमेश मिलिंदकर, नामदेव भोसले, भास्कर बोरुडे, वेदश्री काळे, बाबू खराबे, भाजपच्या नीता परदेशी, उज्ज्वला सावंत, माउली वाळके,, विधानसभा मतदार संघातील सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख, महिला सेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विश्वनाथ टेमगिरे, दत्तात्रेय भालेराव, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.