Nigdi News : निगडी, तळेगाव येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार

एमपीसी न्यूज – निगडी आणि तळेगाव येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार संबधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. निगडी येथील रविवारी (दि.06) आणि तळेगाव येथील घटना सोमवारी (दि.07) घडली.

ओटास्कीम, निगडी येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे फिर्याद मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तळेगाव येथील मौजे इंदोरी, मावळ येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञातांनी अपहरण केले आहे. याबात मुलीचे वडील मोहन ज्ञानेश्वर लोखंडे (वय 45, रा. कांदेवस्ती, इंदोरी मुळगाव – तांदुळवाडी, माळशिरस, सोलापूर) यांनी एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.