Nigdi News : बनावट शिधापत्रिका तयार करून पैसे गोळा करणाऱ्या दोघांना अटक 

एमपीसी न्यूज – बनावट शिधापत्रिका तयार करून त्यावर परिमंडळ कार्यालयाचे खोटे शिक्के व सह्या करून पैसे गोळा करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.9) आकुर्डी येथील संत तुकाराम व्यापारी संकुलाच्या पार्किंगमधून त्यांना अटक करण्यात आली आहे.  

अल्ताफ मोहम्मद शेख (वय 29, रा. त्रिवेणी नगर तळवडे) व राजेंद्र दादा कसबे ( वय 55, रा. नढेनगर, काळेवाडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे बनावट शिधापत्रिका तयार करून त्यावर परिमंडळ अधिकारी निगडी (अ-विभाग), परिमंडळ सहाय्यक अधिकारी (फ-विभाग) पुणे यांचे खोटे शिक्के व सह्या मारुन खोटा दस्त ऐवज तयार करून पैसे मिळवायचे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.