Nigdi News: माजी खासदार अमर साबळे यांच्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसचे ‘माफी मांगो आंदोलन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील महाराष्ट्र राज्य व काँग्रेस पक्षाबद्दल केलेल्या अपमानाकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांच्या निगडी येथील निवासस्थानासमोर आज (मंगळवारी) माफी मांगो आंदोलनाद्वारे निर्दशने करण्यात आली.

आज निगडी प्राधिकरण परिसरातील माजी खासदार अमर साबळे यांच्या घरासमोर शहर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी 10 वाजता एकवटले व जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपाचा निषेध व्यक्त केला. माफी मांगो,माफी मांगो, नरेंद्र मोदी माफी मांगो !, नरेंद्र मोदी मुर्दाबाद !, महाराष्ट्र के सन्मान मे, काँग्रेस पार्टी मैदान मे !, माफी मागा, माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा !, शर्म करो,शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो ! अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, कार्याध्यक्ष दिलीप पांढारकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष माऊली मलशेट्टी,भोसरी विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष दिनकर भालेकर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॅा.वसीम ईनामदार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सुनिल राऊत, के.हरिनारायणन, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, स्वप्निल बनसोडे, अबूबक्र लांडगे, तारीक रिझवी, रवी नांगरे, रवी कांबळे, विजय ओव्हाळ, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिपक भंडारी, निखिल भोईर, युनुस बागवान, झेवियर ॲंन्थोनी, बाबा बनसोडे, किरण नढे, सुरज गायकवाड, हरिष डोळस, जयकर गायकवाड, मिलिंद वाघमारे, गुंगा क्षीरसागर, पांडूरंग जगताप, भास्कर नारखेडे,आण्णा कसबे आदी पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.