Nighoje : एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एचआरकडे तक्रार केल्याच्या रागातून तिघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण ( Nighoje ) केली. तसेच तरुणाच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री नऊ वाजताच्या सुमारास निघोजे गावात महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोर घडली.

Moshi : दुकानदार महिलेला धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

सोमेन शंकर माल (वय 28, रा. वाकी खुर्द, ता. खेड. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश गायकवाड (रा. निघोजे, ता. खेड) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी गणेश हे एकाच कंपनीत काम करतात. गणेश हा काम करत नसल्याने त्याची तक्रार फिर्यादी यांनी एचआरकडे केली. त्या रागातून गणेश याने त्याच्या दोन साथीदारांसोबत येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास ( Nighoje ) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.