Digital Payment, : आता Facebook Messenger द्वारे करा पेमेंट
एमपीसी न्यूज : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या मेसेंजरमध्ये 3 नवे फीचर्स सामिल केले आहेत. या फीचर्समध्ये QR कोडसह पेमेंट, क्विक रिप्लाय बार आणि नव्या चॅट थीम्स सामिल आहेत.
या नव्या फीचर्समुळे युजर्सला फेसबुक मेसेंजरवर अधिक सुविधा मिळतील. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या वार्षिक डेव्हलपर मीटिंगमध्ये फेसबुक व्हिडीओ कॉलमध्ये AR बेस्ड फिल्टर्स सामिल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. हे नवं फीचर फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोन्हीमध्ये दिलं जाईल.
अमेरिकेत फेसबुक मेसेंजरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा आधीच चालू करण्यात आली आहे. या फीचरचा वापर करुन युजर आपल्या मेसेंजरद्वारे QR कोड स्कॅन करुन दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकतो. यासाठी युजरला फेसबुक किंवा दुसरं कोणतंही अॅप डाउनलोड करण्याची गरज लागणार नाही.
तसंच पेमेंट करताना कोणत्याही कॉन्टॅक्टला अॅड करावं लागणार नाही. याचा वापर करण्यासाठी युजरला मेसेंजर सेटिंगमध्ये फेसबुक पे द्वारे आपला QR कोड दुसऱ्या व्यक्तीला पाठवावा लागेल, जिथे पैसे पाठवायचे आहेत किंवा ज्याच्याकडून घ्यायचे आहेत.