Kharadi : खराडी परिसरात एक दिवसाआड पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज – सुरळीत पाणीपुरवठा करता याव यासाठी खराडी (Kharadi) परिसरात शनिवार (दि.10) पासून एक दिवसाड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे शहरात सध्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.यामुळे प्रभाग क्र 4 येथील खराडी (Kharadi) परिसरात पाणीपुरवठा व्यायस्थित होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे.खराडी मध्ये खालील प्रमाणे एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे
एक दिवसआड पाणीपुरवठा होणारा भाग व वेळ
शुक्रवार, रविवार, मंगळवार
सुधारित वेळ दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 चंदननगर श्रीकृष्ण सोसायटी, हनुमान व्यायाम शाळा, मथुरानगर, संघर्ष चौक, शिवाजी पुतळा, दत्तप्रसाद, चव्हाण नगर, त्रिमूर्ती सोसायटी, प्रीत नगर, समता सोसायटी, म्हाडा सोसायटी, नागपाल रोड. सुधारित वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 2 चौधरी वस्ती, सातवबस्ती, पंढरीनगर, गुलमोहर, रक्षकनगर, शंकरनगर,
शनिवार, सोमवार, बुधवार
सुधारित वेळ दुपारी 1.30 ते सायंकाळी 6 बोराटे वस्ती गल्ली नं. 1 ते 13, शंकरनगर, वृंदावन सोसायटी, राघवेंद्रनगर, यशवंतनगर, तुकराम नगर, सितारा बेकरी, साई पार्क, शेजवल पार्क, साईबाबा मंदिर. सुधारित वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 2 गणपती सोसायटी, तुकारामनगर, बोराटेवस्ती, झेन्सार, थिटे नगर, पाटील बुवानगर
तरी नागरिकांनी याची नोंद घेत पाण्याचा साठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.लांबलेल्या मॉन्सून मुळे धरण पातळी दिवेंदिवस कमी होत असल्याने शहर परिसरात पाणी कपात व टँकर ची नामुष्की ओढवली आहे. पावसाला सुरुवात होईपर्यंत नागरिकांना हि तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

https://youtu.be/592f_mGf_8k

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.