Pune News : पंतप्रधान आवास योजने अंर्तगत 2 हजार 916 सदनिका निर्मितीचे उद्दिष्ट

एमपीसी न्यूज : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे शहरात 2 हजार 916 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. 

अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनासाठी सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव आदी परिसरातील 8 प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार एकूण 1124 सदनिका बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात खराडी येथे 786 आणि हडपसर येथे 340 सदनिका बांधण्यात येत आहेत. या दोन्ही प्रकल्पासाठी लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे.

हडपसर येथे 684 आणि वडगाव येथे 1108 असा एकूण नवीन 1792 सदनिकांचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. अशाप्रकारे यावर्षी शहरात एकूण 2916 सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 70 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असेही हेमंत रासने यांनी सांगितले. दरम्यान, पुणे शहरात घर होणे हे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. ही योजना मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.