Pimpri Corona News : शहरातील सक्रिय 7080 पैकी 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे, 4307 जणांमध्ये काहीच लक्षणे नाहीत

Of the 7080 active corona patients in the city, 929 patients have corona symptoms, while 4307 have no symptoms at all.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या 7 हजार 80 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी तब्बल 4 हजार 307 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. हे रुग्ण ‘कोरोनावाहक’ होऊ शकतात. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर, 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्यात 113 जणांची प्रकृती गंभीर असून 51 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च रोजी सापडला होता. मार्च, एप्रिल आणि अर्धा मे महिना शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती.

परंतु, अर्धा मे संपल्यानंतर शहरातील रुग्ण संख्येत प्रचंड झपाट्याने वाढ झाली. शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. कोरोनाने संपूर्ण शहराला व्यापले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

10 मार्चपासून शहरातील 26,685 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 19,142 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, सध्या 7080 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 4307 बाधितांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. 929 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून 113 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 51 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पॉझिटीव्ह पण कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत असे 4307 रुग्ण आहेत. त्याचे प्रमाण 80 टक्के आहे. पण, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कारण, हे रुग्ण कोरोना ‘वाहक’ होऊ शकतात. पण, प्रशासनाकडून त्याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. तर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.