Pune : सारसबागेसमोरील महालक्ष्मी देवीला 13 किलो वजनाची सोन्याची साडी अर्पण

एमपीसी न्यूज – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मी देवीस आज गुरुवारी सोन्याची साडी परिधान करण्यात आली. देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ८ वे वर्ष होय.

दरवर्षी विजयादशमी निमित्त श्री महालक्ष्मी देवीस सोन्याची साडी परिधान करण्याची श्री महालक्ष्मी मंदिर , सारसबाग , नवरात्रोत्सवातर्फे परंपरा आहे. अंदाजे १३ किलो वजनाची ही साडी संपूर्ण शुध्द सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. कुंभकोणम येथील कारागिरांनी तब्ब्ल १ वर्षे मेहनत करून ही साडी तयार केली आहे .

या कारागिरांनी पुण्यात मंदिरात १ वर्षे मुक्काम करून अहोरात्र कष्ट करून ही साडी तयार केली. ही सोन्याची साडी खास विजयदशमीच्या दिवशी देवीला परिधान केली जाते. सुवर्ण वस्त्राने परिधान देवीचे हे आगळे वेगळे रूप भाविकांना उद्या विजयादशमीच्या दिवशी रात्री पर्यंत अनुभवता येणार आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.