Dehu gaon : देहुगाव येथील इलेक्ट्रिक डीपी मधून ऑइल, कॉईल चोरीला

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक डीपी मधील ऑइल आणि (Dehu gaon) कॉपरच्या कॉईल असा पावणे दोन लाखाचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 18) सकाळी अभंग शाळेजवळ, देहूगाव येथे उघडकीस आला.

ओजस किरणकुमार शाह (वय 32, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : गाडगेबाबा हे स्वच्छता संस्कृतीचे जनक – काशिनाथ नखाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगावातील अभंग शाळेजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील 42 हजार रुपयांचे डीपी ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि एक लाख 33 हजार रुपये किमतीच्या कॉपर कॉईलचे सहा नग असा एकूण एक लाख 75 हजार रुपयांचा माल अज्ञातांनी चोरून नेला. (Dehu gaon) हा प्रकार शनिवारी (दि. 17) मध्यरात्री दोन ते रविवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.