Kishor Aware: किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मिळणार ‘मायेची ऊब’

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबर रोजी किशोर आवारे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे जनसेवा विकास समितीने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेच्या तळेगाव शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात येणार आहे. थंडीच्या दिवसात जनसेवा विकास समितीच्या मायेची ऊब सर्वच विद्यार्थ्यांना लाभावी, हा यामागील उद्देश असल्याने आवारे (Kishor Aware) यांचा वाढदिवस बाल गोपालांच्या सानिध्यात साजरा करणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच, सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरे यांचा स्मृतिदिन ‘शिवसंस्कार दिन’ म्हणून साजरा करणार

सदर अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले असून मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात येणार असल्याचे जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी नमूद केले आहे.

सदर कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी नगराध्यक्षा श्रीमती सुलोचनाताई आवारे यांचे निवासस्थान स्वप्ननगरी येथे आयोजित केला असून तळेगाव शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना सकाळी व सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्यास निमंत्रित केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.