Wakad Crime News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेसमोर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हनुमाननगर, थेरगाव येथे रविवारी (दि. 12) रोजी रात्री सात वाजता घडली.

सुमित अनिल माळी (वय 18, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या घरात रविवारी रात्री सात वाजताच्या सुमारास स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता आरोपी हा फिर्यादी यांच्या मुलीकडे येत होता. फिर्यादी दिसताच आरोपीने त्यांच्यासमोर अश्लील हावभाव करून त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.