Wakad Crime News : वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसाय चालवून त्यावर आपली उपजीविका भागवणा-या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) दुपारी पावणे पाच वाजता व्हिजन वन मॉल, वाकड येथे करण्यात आली.

सुरजकुमार गोविंदबहादूर सिंह (वय 26, रा. व्हिजन वन मॉल, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस हवालदार सुषमा कांबळे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरजकुमार याने व्हिजन वन मॉल येथे सॅनटोना केरला आयुर्वेदिक स्पा नावाने स्पा सेंटर सुरु केले. तिथे त्याने तीन महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून आलेल्या रकमेतून त्याने आपली उपजीविका भागवली. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. त्यात आरोपी सूरजकुमार याला अटक करून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.