Hinjawadi News : मुंबई-बेंगलोर महामार्गावर सिलेंडर वाहतूक करणारा ट्रक आणि जीपचा अपघात; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मुंबई-बेंगलोर महामार्गावर पाषाण येथे गॅस सिलेंडर वाहून नेणा-या ट्रकने जीपला मागून धडक दिली. धडक बसलेल्या जीप चालकाने नियंत्रण सुटले आणि जीपने एका पादचा-याला धडक दिली. यात पादचा-याच्या मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 20) रात्री घडला.

महिपाल भगीरथराम बिष्णोई (वय 25, रा. जोधपूर, राजस्थान), कांचन भट (वय 41, रा. कोथरूड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन बेबले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत्यू झालेल्या पादचा-याची अद्याप ओळख पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिपाल हा त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये गॅस सिलेंडर घेऊन मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जात होता. पाषाण येथे त्याने ट्रकने समोर जात असलेल्या आरोपी कांचन याच्या जीपला मागून धडक दिली. यामध्ये कांचन याचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.