Sangvi Crime News : गॅरेजचे शटर उघडून 56 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज – गॅरेजचे शटर उघडून अज्ञात चोरट्यांनी 56 हजारांचे लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी गोविंद यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली.

हेमंत अनिल आडवाणी (वय 28, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे मंगलमूर्ती सीएनजी ऑटो गॅसचे गॅरेज आहे. त्यांनी सोमवारी (दि. 20) रात्री त्यांचे गॅरेज पावणे नऊ वाजता कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गॅरेजचे शटर उघडून आत प्रवेश केला.

एक लॅपटॉप, तीन सीएनजी कंपनीच्या टाक्या, एक लोखंडी स्टॅन्ड असा एकूण 56 हजारांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.