Bhosari Crime News : चिनी कंपनीच्या बनावट ईमेल आयडीद्वारे व्यावसायिकाची सव्वानऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्तीने एका चिनी कंपनीच्या नावाने मेलआयडी तयार करून त्याद्वारे भोसरी येथील एका व्यावसायिकाकडे पैसे पाठवण्याची मागणी केली. व्यावसायिकाने देखील नऊ लाख 23 हजार रुपये अज्ञात व्यक्तीला चीनमधील एका बँकेच्या खात्यावर पाठवून दिले. हा प्रकार 8 मार्च 2021 रोजी साई कंट्रोल सिस्टीम, एमआयडीसी भोसरी येथे घडला असून याप्रकरणी 8 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान विठ्ठल वेळे (वय 53, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार [email protected] हा बनावट मेल तयार करणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चीनमधील नानजिंग जेईरूम कॉ. ली या कंपनीसोबत ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. या कंपनीच्या एका अनोळखी इसमाने [email protected] हा बनावट मेल आयडी तयार केला. त्यावरून फिर्यादी यांना बीएनएल बँकेच्या एका अकाउंटमध्ये 12 हजार 600 यूएस डॉलर (नऊ लाख 23 हजार 328 रुपये) पाठवा असे सांगितले. व्यावसायिक संबंध असल्याने फिर्यादी यांनी त्या खात्यावर पैसे पाठवले. अज्ञात आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.