Chakan Crime News : मेन्टनन्स विभागाच्या हेडकडून कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

एमपीसी न्यूज – देखभाल दुरूस्ती विभागाच्या प्रमुखाने (मेन्टनन्स हेड) कंपनीतील महिला कर्मचा-याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योशिका इंजीनियरिंग प्रा. लि. कंपनी, खराबवाडी, खेड येथे रविवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने शुक्रवारी (दि.18) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून देखभाल दुरूस्ती विभागाच्या प्रमुखाविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 अ, 509 आणि 500 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला योशिका इंजिनिअरींग कंपनीत काम करतात. कंपनीच्या देखभाल दुरूस्ती विभागाच्या प्रमुखाने फिर्यादी यांच्याकडे एकटक पाहत अश्लील हावभाव केले. तसेच, मशीन शॉपचे सुपरवायझर यांच्याजवळ जाऊन त्यांना फिर्यादी यांचे व्हिडीओ आणि चॅटींग माझ्याकडे आहेत असे सांगून फिर्यादी यांची कंपनीत बदनामी केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. चाकण पोलीस अधिक तापस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.