RTE Admission : आरटीई 25 टक्के प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी होणार जाहीर

एमपीसी न्यूज : आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत उद्या पार पडणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत मुलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. (RTE Admission)   त्यानुसार 2023-24या शैक्षणिक वर्षासाठी  आरटीई 25टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार (आरटीई), दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी  आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

Pune Railway : पुणे रेल्वेने मार्च महिन्यात 21 हजारहून अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना ठोठावला कोटीं रुपयांचा दंड

राज्यातील सुमारे 1 लाख 1 हजार 969 जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख 64 हजार 472 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल. (RTE Admission) तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. राज्यातील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 65 हजार 258 म्हणजेच प्रवेश क्षमतेच्या तीन पटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याला लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश मिळणार याबाबतची उत्सुकता (RTE Admission) निर्माण झाली आहे. प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या सर्व पालकांना उद्याची प्रतिक्षा आहे. मुलांच्या उत्तर भविष्यासाठी प्रत्येक पालक या सोडतीकडे डोळे लावून बसले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.