OTT Platforms Blocked : 18 ओटीटी, 19 वेबसाईट, 10 अॅप्स, 57 सोशल मिडीया अकाउंट ब्लॉक

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची कारवाई

एमपीसी न्यूज – ऑनलाईन माध्यमांवरील अश्लील आणि असभ्य मजकूर व माहितीबाबत (OTT Platforms Blocked)माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सातत्याने इशारा देऊन देखील त्याबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्याने त्याबाबत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालयाने 18 ओटीटी प्लॅटफॉर्म, 19 वेबसाईट, 10 अॅप्स आणि 57 सोशल मिडीया (OTT Platforms Blocked)अकाउंट माहिती व प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केले आहेत. याबाबत मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

https://x.com/DDNewslive/status/1768166646970200520?s=20

क्रिएटीव्हीटीच्या नावाखाली असभ्य, अश्लील सामग्री तयार करणे तसेच त्याचा प्रचार न करण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सातत्याने सूचना दिल्या होत्या. माहिती तंत्रज्ञान कायदा, सरकारचे विविध विभाग आणि तज्ञांशी चर्चा करून मंत्री ठाकूर यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

PCNTDA : प्राधिकरण परताव्याचा जीआर निघाला

ब्लॉक करण्यात आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मिडियावर अश्लील, असभ्य साहित्य प्रसारित करण्यात आले. तसेच महिलांच्या बाबतीत असभ्य चित्रण करण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी, कुटुंबातील अनैतिक संबंध अशा विषयांवर अतार्किक चित्रण केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Facebook वरील 12, instagram वरील 17, X वरील 16 आणि Youtube वरील 12 अकाउंट बंद करण्यात आले आहेत.

ब्लॉक केलेले ओटीटी प्लॅटफॉर्म

Dreams Films, Voovi, Yessma, Uncut Adda, TriFlicks, X Prime, Neon X VIP, Besharams, Hunters, Rabbit, Xtramood, Nuefliks, MoodX, Mojflix, Hot Shots VIP, Fugi, Chikooflix, Prime Play

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.