Maval : परंदवडी येथे एक आदर्श ठाकरवस्ती मॉडेल उभारणार- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – बांधकाम मजूर घरकुल व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मावळ तालुक्यात परंदवाडी येथे एक आदर्श ठाकरवस्ती मॉडेल लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा मावळचे आमदार व राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केली.

भारतीय जनता पक्ष व राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली सोमाटणे फाटा येथून गणपती दर्शन व जनआशीर्वाद यात्रेला कालपासून (3 सप्टेंबर) सुरू झाली असून आज परंदवडी येथे गणरायाचे पूजन व दर्शन घेऊन जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाळा भेगडे यांनी ठाकर वस्ती येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

मावळ तालुक्यात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोर-गरीबांना स्वतःच्या हक्काच्या मालकीचे घर देण्याचे काम सुरू असून आत्तापर्यंत बाराशे ते पंधराशे घरकूल मंजूर करून देण्याचे काम राज्यमंत्री भेगडे यांनी केले आहे. आमच्या हक्कासाठी उभा राहणारा असा मंत्री आम्हाला परत हवा, अशा भावना ठाकरवस्तीतील रहिवाशांनी व्यक्त केल्या.

भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, निवृत्ती शेटे, माऊली शिंदे, शांताराम काजळे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप काकडे, कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, संचालक पांडुरंग ठाकर ,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलकाताई धानिवले, पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले,तळेगावचे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, संचालक तात्या गराडे, भाजपा ज्येष्ठ सर्व सरचिटणीस, संघटनमंत्री राजेश मुऱ्हे, युवा मोर्चाचे संघटनमंत्री रामा गोपाळे, यादव सोरटे, सूर्यकांत भाऊ सोरटे,चिराग खांडगे,भाजप सर्व लोकप्रतिनिधी, मित्र पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.