Pavana Dam News : पवना धरण 100 टक्के भरले; धरणातून विसर्ग बंद; गेल्यावर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 2.27 टक्के जास्त

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले आहे.धरण क्षेत्रात सलग तीन दिवस पाऊस नसल्याने मंगळवारी विसर्ग बंद करण्यात आला आहे.

सोमवारी दिवसभरात सकाळी 6 पासून ते आज सकाळी 6 पर्यंत 0 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तसेच मंगळवार सकाळपर्यंत एकूण 2281 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस 2081 मिमी होता.त्यामुळे 200 मिमी पाऊस यावर्षी आजपर्यंत जास्त झाला आहे.तसेच आजचा पाणीसाठा 100 टक्के आहे.गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 97.73 टक्के होता.त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 2.27 टक्के जास्त आहे.

पिंपरी चिंचवडसह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्या स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते.शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बांधर्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

पवना धरणातील परिस्थिती

गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 0 मिमी.

1 जूनपासून झालेला पाऊस : 2281 मिमी.

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस : 2081 मिमी.

धरणातील सध्याचा पाणीसाठा :100.00 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 97.73 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ  : 0.0 टक्के

आजची पाण्याची आवक : 0.56 द. ल. घ. मी

आजपर्यंत पाण्याची आवक : 287.89 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 240.97 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा एकूण पाणीसाठा : 272.11 द. ल. घ. मी

धरणातील पाणी पातळी: 613.26 मीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.